संख | कन्नड कविता लेखक संखचे राकेश घाळी यांचा गौरव पुरस्काराने सन्मान | www.sankettimes.com

0
4

संख,वार्ताहर:संख (ता.जत) येथील राकेश घाळी हे एक सॉप्टवेअर इंजिनियर असून कर्नाटक राज्यात बेंगळूर येथे एका कंपनीत सध्या कार्यरत आहेत.ते कविताही करतात.घाळी यांना त्यांच्या दोन कविताचा गौरव करत कर्नाटक येथील हुबळी येथे कर्नाटक दर्शन या वर्तमानपत्रच्या वतीने आयोजीत करण्यात आलेले एका कार्यक्रमात विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या व्यक्तीचा कर्नाटक राज्य ज्ञानदिप पुरस्कारने गौरविण्यात आले.बेंगळूर येथील सॉप्टवेअर कंपनीत इंजिनियर म्हणून काम करीत असलेल्या राकेश घाळी यांचाही यांच कार्यक्रमात प्रशस्तीपञ देऊन गौरव करण्यात आला. राकेश घाळी यांनी प्रंचड कष्ठ,व कष्ठातून हे यश मिळवून संखचे नाव उज्वल केले आहे.घाळी यांनी आतापर्यत 600 कविता लिहिल्या आहेत.घाळी यांच्या कविता असलेल्या कन्नड चित्रपटचे नाव “विराधी विरा”मध्ये बानीन आचे ही व अन्य एक अशा दोन कविता वापरण्यात आल्या आहेत. घाळी यांची कविता असलेल्या गाणे प्रसिद्ध झाले आहे.या यशाबद्दल घाळी यांना संख येथील बिग बजारचे मालक व मॅनेजर अहमद शेख,अप्पु पुजारी ,सर्व स्टॉपचे मार्गदर्शन लाभले.घाळी यांचे सर्वत्र अभिंनदन होत आहे.  

कन्नड कविता लेखक संखचे राकेश घाळी यांचा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here