जत | वन विभाग कार्यालयालगतचे वृक्षाचे पाण्याअभावी जळण बनले | www.sankettimes.com

0
18

जत,प्रतिनिधी : शासनाच्या योजनेतून वनखात्याच्या शेजारी लावलेल्या झाडांची योग्य प्रकारे निगा वन विभाग घेत नसल्यामुळे वाढत्या उन्हामुळे तीन फुटापर्यत आलेल्या वृक्षाचे जळण बनले आहे. संगोपन न झाल्याने ही झाडे सुकू लागल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे.  मोठा गाजावाजा करून लावलेली झाडे कोमेजलेली आहेत. पाच-सहा फुटांपर्यंत वाढलेली झाडे पाण्याअभावी सुकू लागल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का? असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमी विचारत आहेत. जतचा वन विभागाकडून बऱ्यांच योजनेतून वृक्ष लागवड दरवर्षी होते.करोडोच्या निधीचा चुराडा होतो.मात्र लावलेल्या झाडापैंकी फक्त दहा टक्के झाडे जगली आहेत.बाकीचे झाडे संगोपनाअभावी वाळू गेले आहेत. त्यात खड्ड्यात वाळलेल्या झाडाच़्या काठ्या काढून तेथेच पुन्हा गाजावाज करून वृक्षलागवडीचे सोपस्कर पुर्ण करण्यात वन विभाग ध्यनता मानत असल्याचे जत तालुक्यातील चित्र आहे.

जत वन विभागाच्या लगत लावलेले वृक्ष पाणी न घातल्याने उन्हाच्या तडक्याने वाळू गेले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here