जत,प्रतिनिधी : जत तालुक्याच्या महसूली भार कमी करण्यासाठी सुरू होणारे संख अप्पर तहसिल कार्यालयाचे उद्धाटन अखेर उद्या 26 जानेवारीला ठरले आहे. अप्पर तहसिल कार्यालयासमोर सकाळी 9.30 झेंडावंदन होणार आहे. झेंडावंदन झाल्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यालय उद्धाटनाचा नारळ फुटणार आहे.पांटबंधारे विभागाच्या इमारती हे कार्यालय सुरू होणार आहे. तेथे सर्व तयारी पुर्ण झाली आहे. अनेक अडथळ्याची शर्यत पार करत कार्यालयाचा शुंभारंभ निश्चित झाले आहे. जतचे आमदार विलासराव जगताप यांच़्या पाठपुराव्याला यश आले आहे. कार्यालयाचे उद्धाटन अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. आमदार विलासराव जगताप, तहसिलदार अभिजित पाटील, माजी सभापती आर.के. पाटील प्रमुख उपस्थित असतील.
सभापती तम्माणगौंडा रवी पाटील, जि.प.सदस्य सरदार पाटील, रेखा बागेळ्ळी,पंचायत समिती सदस्य आडव्याप्पा घेरडे,मनोज जगताप,कविता खोत,लक्ष्मी माळी,उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येंने उपस्थित रहावे असे आवाहन संरपच मंगल पाटील यांनी केले.







