भिमा कोरेगाव घटनेच्या निर्षेधार्थ जतमध्ये एक बस,ट्रक पेटविली,दोन बसेसवर दगडफेक

0
7

जत,डफळापूर, माडग्याळसह सुमारे वीस गावात कडकडीत बंद

जत,प्रतिनिधी : जत,प्रतिनिधी : भिमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद जत तालुक्यात उमटले.मंगळवारी सायकांळी एक बस,एक ट्रक अज्ञाताकडून पेटविण्यात आली.मंगळवारी संध्याकाळी जत-सांगली रस्त्यावर सांगलीकडे जाणारी बस,व जत-सातारा रोडवरील एक ट्रक अज्ञातकडून पेटवून देण्यात आली. मंगळवारी काही खाजगी वाहने, बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची अज्ञातावर गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे. 

दरम्यान बुधवारी भिमा कोरेगाव घटनेच्या निर्षेधार्थ जत शहरात बंद पाळण्यात आला. मंगळवार सायकांळ पासून अंदोलन सुरू होते. बुधवार दिवसभर जत शहर डफळापूर, माडग्याळसह सुमारे वीस गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.काही बसेस,खाजगी वाहनाची तोडफोड करण्यात आली. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.मंगळवारी पुर्ण दिवसभर पोलिस निरिक्षक राजू तासिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे अनुसुचित घटना रोकण्यात यश मिळाले. कालचे व आजचे काही अपवाद वगळता बंद शांततेत पाळण्यात आला.

फोटो

जत: जत-सांगली रस्तावर रामपुर येथे पेठविलेली बस,बुधवारी फोडलेली बस,शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here