सोन्याळ मारहाण प्रकरण :पाच आरोपीना अटक

0
9

उमदी,वार्ताहर:

    सोन्याळ (ता. जत) येथे राजकीय वादातुन सोमवारी सकाळी दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी उमदी पोलिसांनी सहा संशियत आरोपीना अटक केली, मारहाणीत वापरलेली साहित्य जप्त केले आहे.   

     सोन्याळ येथे राजकीय वादातुन भाजपा कार्यकर्ता व माजी उपसरपंच चिदानंद तेली व कॉंग्रेसचे कार्यकर्ता श्रीशैल चौगुले यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटाचे अनेकजण जखमी झाले आहेत. दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.  सुनिल रायाप्पा तेली, रायाप्पा ईराप्पा तेली ,शिवानंद विठ्ठल नंदुर ,जक्काण्णा विठ्ठल नंदुर ,श्रीशैल इराप्पा तेली,सिध्दाण्णा श्रीशैल तेली या सहा संशियत आरोपीना अटक करण्यात आल्याची माहिती उमदी पोलिसांनी दिली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here