नगरपालिका निवडणूक ;शेवटचे दोन दिवस उरले : फक्त तिन अर्ज दाखल

0
10

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका निवडणूकीतील अर्ज भरण्याची मुदत दोन दिवस उरले असतानाही फक्त तिनच अर्ज दाखल झाल्याने प्रशासनाची धाकधूक सुरू आहे. प्रत्यक्षात 16 नोव्हेंबर चालू झालेली अर्ज दाखल करण्याची प्रक्रियेचे दोन दिवस उरले आहेत. आज व उद्या अर्ज दाखल करणारे उमेदवार मोठ्या संख्येने गर्दी करणार हे निश्चित आहे.

पातव्या दिवशी तीन अर्ज दाखल झाले. त्यात प्रभाग क्र.2 मधून राष्ट्रवादीच्या प्रमिला नरसिंहराव राजेशिर्के,प्रभाग क्र.3मधून अपक्ष उमेदवार लक्ष्मी प्रंशात भद्रे,तर प्रभाग क्र.10 आयेशा अहमद शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाच दिवसापासून निवडणूक विभागाचे कर्मचारी ताटकळत बसले आहेत.पक्षाची उमेदवार जाहीर नसल्याने व नगरसेवक निवडणूकीत आपला तग लागणार नाही म्हणून ऐनवेळी अनेकांनी तलवारी म्यान केल्याने उमेदवारी अर्ज कमी प्रमाणात दाखल झाल्याचे राजकीय जानकारांचे मत आहे. अनेकजण पक्षाने तिकीट दिले तरचं लढू या भूमिकेत आहेत. त्यामुळे अधिकृत्त एबी फॉर्मची वाट पाहिली जात आहे. अवधी दोन दिवस असल्याने अाज पक्षाचे उमेदवार निश्चित होऊ शकतात. त्यामुळे शेवटचे दोन दिवस मोठी गर्दी होणार आहे.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम म्हणाले,शेवटचे दोन दिवसाची गर्दी लक्षात घेऊन सर्व व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संथ असल्याने आज व उद्या गर्दी होणार हे अपेक्षित आहे.निवडणूक विभागाचे निकषानुसार व वेळेत अर्ज स्विकारण्यात येतिल. पक्षाच्या उमेदवारांनी ता.22 दुपारी तीनपर्यत पक्षाचे एबी फॉर्म देणे बंधनकारक आहे.गर्दी व अर्ज तपासणीसाठी आकरा टेबलवर सोय केली आहे. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here