राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटच्या 48 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
इस्लामपूर,प्रतिनिधी;हा गळीत हंगाम महत्वाचा आहे. आपणास कोणत्याही परिस्थितीत तिन्ही युनिट मध्ये 20 लाख मे.टन ऊसाचे गाळप करावयाचे आहे. यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. सर्व घटकांचा हातभार लागायला हवा. आपल्या गावातून ऊस बाहेर जाणार नाही, किंवा आपल्या कारखान्याच्या पाणीपुरवठा योजनांवरील ऊसाची इतर विल्हेवाट होणार नाही,याकडे कटाक्षाने लक्ष दया,असे आवाहन माजी ग्रामविकासमंत्री आ.जयंतराव पाटील यांनी साखराळे येथील समारंभात बोलताना केले.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटच्या 48 व्या गळीत हंगाम शुभारंभ समारंभात आ.पाटील बोलत होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते वजनकाटा,गव्हाण पुजन करून उसाची पहिली मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन पी.आर.पाटील,व्हा.चेअरमन विजयबापू पाटील,राजारामबापू सह.बॅकेचे चेअरमन प्रा.शामराव पाटील,व्हा.चेअरमन जनार्दनकाका पाटील,राजारामबापू दुध संघाचे चेअरमन विनायक पाटील,पं.स.सभापती सचिन हुलवान,उपसभापती नेताजीराव पाटील, प्रामुख्याने उपस्थित होते. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन राजारामबापू सह.बॅकेचे संचालक विजयराव यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन पी.आर.पाटील यांचा 74 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
आ.पाटील म्हणाले,सध्या उस दराची चर्चा सुरू
आहे. आप-आपली मते मांडली जात आहेत. आपणास सर्वांच्याबरोबर राहून गळीत हंगाम यशस्वी
करावयाचा आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात एफआरपीची संकल्पना
आल्याने शेतक-यांना सतत चढता दर मिळत आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र वाढले असून
पुढच्या वर्षी आणखी वाढ होणार आहे.तेलाचे दर पडल्यामुळे सोयाबीनला 2600-2700 च्यावर दर मिळत नाही. आपला
कर्मचारी फडात जावून उसाची नोंद करू शकेल,असे
सॉफटवेअर त्याच्या हाती देण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या परिसरातील शेतकरी
आपल्या शेतात जास्तीत-जास्त उसाचे उत्पादन घेण्यासाठी कष्ट करीत आहे. बहुतेक
शेतकरी एकरी 100
टनापर्यंत पोहचले असून बरेच एकरी 140,150
टनापर्यत आले आहेत. विक्रमी उत्पादन घेणा-या शेतक-यांच्या सन्मानार्थ विशेष उपक्रम
राबविण्याची गरज आहे. आपण सर्व युनिटस अद्यावत केल्यामुळे 13 टक्के रिकव्हरी मिळविण्यास
फारशी अडचण नाही.
पी.आर.पाटील म्हणाले,गेल्या वर्षी आ.जयंतराव
पाटील यांच्या मार्गदर्शना खाली साखराळे युनिटची गाळप क्षमता 7 हजार मे.टन करून येथेच 28 मेगावॅट क्षमतेचा सविद्युत
प्रकल्प उभारण्यात आला. मात्र गेल्या वर्षी बेअरिंगच्या तांत्रिक अडचणमुळे या
युनिटमध्ये गाळप कमी झाले. ही तांत्रिक दुरूस्ती करण्यात आली आहे.आपण सर्वांनी
आपल्या शेतातील उस आपल्या कारखान्यास देवून आपले गाळपाचे उदिदष्ट पुर्ण करण्यास
सहकार्य करा. आपल्या कारखान्याने मोठया कष्टाने उभा केलेल्या पाणीपुरवठा योजनावरील
उसाची इतर विल्हेवाट होणार नाही,याकडे
त्या-त्या संस्थेच्या संचालक मंडळाने लक्ष दयायला हवे.आपली डिस्टिलरी 21 सप्टेंबरला सुरू केली असून
1 कोटी 30 बॅरल रेक्टीफाय स्पिरीट
घेण्याचे उदिदष्ट आहे.
बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील,उपसभापती सुरेश गावडे,राष्टवादी कॉग्रेसचे
विष्णूपंत शिंदे,भिमराव
पाटील,माजी जि.प. माजी अध्यक्ष
देवराज पाटील, कासेगांव
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामरावकाका पाटील,युवक
राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, तालुकाध्यक्ष
संग्रामसिंह पाटील,जिल्हा
सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला
जिल्हाध्यक्षा सौ.छाया पाटील,संजय
पाटील,सौ.सुस्मिता जाधव,शहाजीबापू पाटील,सुभाषराव सुर्यवंशी, अजय चव्हाण,बाळासाहेब पवार, शिवाजीराव मगर,सुहास पाटील,सी.व्ही.पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले,तानाजी खराडे,कार्यकारी संचालक
आर.डी.माहुली यांच्यासह राजारामबापू समुहातील पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्याचे संचालक,माजी संचालक सभासद, अधिकारी, कामगार उपस्थित होते.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी आभार मानले.प्रसिध्दी अधिकारी विश्वनाथ
पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी- राजारामबापू सहकारी साखर
कारखान्याच्या साखराळे युनिटच्या 48
व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून करताना माजी
ग्रामविकासमंत्री आ.जयंतराव पाटील. समवेत पी.आर.पाटील,प्रा.शामराव पाटील, विजयबापू पाटील, सचिन हुलवान,सौ.छाया पाटील,आर.डी.माहूली,तसेच संचालक मंडळ व
मान्यवर.
फोटो ओळी- राजारामबापू सहकारी साखर
कारखान्याच्या साखराळे युनिटच्या 48
व्या गळीत हंगाम शुभारंभ समारंभात बोलताना माजी ग्रामविकासमंत्री आ.जयंतराव पाटील.
व्यासपीठावर पी.आर.पाटील,प्रा.शामराव
पाटील, विजयबापू पाटील,भिमराव पाटील, विष्णूपंत शिंदे,तसेच संचालक मंडळ व
मान्यवर.
पी.आर.दादांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस व
जेवणाचा बेत!
आ.पाटील यांचे भाषण सुरू असतानाच
पी.आर.दादांचा काल 74 वा
वाढदिवस होता,त्यांचा
कारखान्याच्या वतीने सत्कार करावयाचा असल्याची चिठठी त्यांच्याकडे दिली. त्यांनी
ती चिठठी वाचत‘‘इतक्या
घाईगडबडीने हा सत्कार कसा घेणार?त्यासाठी
समारंभ घ्यावा लागेल,पाहूणा
बोलवावा लागेल,कुरळपात
जेवणाचा बेत करावा लागेल,’असे
मिश्किलपणे म्हणताच सर्वांच्यामध्ये एकच हशा पिकला.





