संखचा विकास केला म्हणून पंचवीस वर्षापासून सत्ता आमच्याकडे : बसवराज पाटील

0
6

संखचा विकास केला म्हणून पंचवीस वर्षापासून सत्ता आमच्याकडे : बसवराज पाटील

संख,वार्ताहर : संखचा सर्वागिंन विकास आम्ही केला,म्हणून जनतेचा आमच्यांवर विश्वास आहे. त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायतीची सत्ता आमच्याकडे आहे. यावेळी ही आमचीच सत्ता असेल असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.संख येथील लायव्वादेवी ग्रामविकास पँनेलच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. 

पाटील पुढे म्हणाले,गावात ग्रामसचिवालय, पेग्विन ब्लॉकचे रस्ते, शाळासह विविध प्रशासकीय इमारती,गटारी,दिवाबत्ती,वाड्यावस्त्यांना वरील विविध योजना सह अनेक विकास कामे केली आहेत. गेली पंचवीस वर्षे सत्ता असताना जनतेच्या कळीचे प्रश्न सोडविले आहेत. ग्रामपंचायत पारदर्शी लोकहिताची बनविली आहे. तेथे कोणाची दहशत नाही. सामान्य नागरिक तेथे ताटमानेने जाऊन आपली कामे करू शकतो. मतलबी राजकारणासाठी आमदारासह विरोधकांना खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी लागते हेच आमच्या यशाचे गणित आहे.लोकांचा मोठा जनसमुदाय आमच्यांकडे आहे. विजय आमचाच आहे. जनतेने भूलथापा बंळी पडू नये असे आवाहन शेवटी पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवर माजी सभापती सुजता पाटील,सुभाष बिरादार,सरपंच पदाच्या उमेदवार सौ.शोभा बिरादर,सर्व पदाधिकारी,  सर्व उमेदवार उपस्थित होते.

संख येथील जाहिर सभेत बोलताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील बाजूस उपस्थित मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here