डफळापूरच्या कायमस्वरूपी टँकरमुक्तीसाठी सत्ता द्या : दिग्विजय चव्हाण
डफळापूर,वार्ताहर : डफळापूरची पाणी योजना पुर्ण करणे हे स्वर्गीय सुनिलबापूचे स्वप्न आहे. ते आम्ही पर्ण करणारचं,योजना रखडवून राजकारण करणाऱ्याना यावेळच्या ग्रामपंचायत निवडणूकीत धडा शिकवा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी केले.
ते डफळापूर येथील स्व. सुनिलबापू चव्हाण ग्रामविकास पँनेलच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते.
चव्हाण पुढे म्हणाले,डफळापूर ग्रामपंचायतीच्या सत्तेचा दुरूउपयोग करून विरोधकांच्या टोळीने निधीचा मोठा गफला करून गावाला विकासापासून दूर ठेवले आहे. प्रत्यक्षात बोगस कामे करून लाखोचा बोगस निधी उचलला आहे. जनतेच्या योजना कुठेही कशाही दर्जाहीन केल्या. निधीत मोठा भष्ट्राचार करून स्वता:ची पोट भरण्याच करेटं कार्यक्रम विरोधातील मंडळीनी केला आहे. त्यामुळे अशा मतलबी सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन चव्हाण यांनी शेवटी केले. यावेळी बाजार समिती सभापती अभिजित पाटील, सोसायटीचे चेअरमन मनोहर भोसले,रमेश चव्हाण, विजय चव्हाण, जयाजी शिंदे,अजितराव गायकवाड,भारत गायकवाड, रमेश कांबळे, सज्जन हाताळे,विजय संकपाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
चौकट
अंकले येथून डफळापूरच्या पाणी योजनाला आमचा विरोध यापुर्वीही नव्हता, आताही नाही. राजकीय फायद्यासाठी योजना रखडून ठेवली आहे. योजनाच्या कामात मोठी अनियमिता आहे. डफळापूरला कायमस्वरूपी टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीतील विजयाची पुर्नावर्ती करा. आम्ही, जिल्हा, तालुक्यातून योजना खेचून आणून डफळापूरला विकास प्रवाहात आणू असे यावेळी बोलताना महादेव पाटील यांनी सांगितले.




