बोगस डॉक्टरांचा नवा फंडा
अधिकृत्त डॉक्टरांचा बोर्ड, प्रमाणपत्रे लावून रुग्णांची तपासणी
जत, प्रतिनिधी : जत तालुक्यात फोफावत असलेल्या वैद्यकीय व्यवसायावर नियंत्रण मिळवण्यात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) आणि तालुका आरोग्य अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत. वारंवार सूचना करूनही बोगस डॉक्टरांना त्यांच्याकडून अभय देण्यात येत असल्याचे दिसते. त्यामुळे जिल्हा अधिकारी यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश दिले आहे. वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास संबंधित पोसिल ठाण्याची मदत घेण्यात यावी, असेही म्हटले आहे.
दोन-अडिच वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार जत तालुक्यातील पन्नासवर बोगस डॉक्टर प्रॅक्टीस करत होते. यानंतर प्रशासनाच्या उदासिनतेमुळे एकदाही बोगस डॉक्टरांचा सर्वे करण्यात आला नाही. विशेष म्हणजे जत तालुक्यातच मोठ्या प्रमाणावर नोंदणी न करता रुग्णालये थाटून व्यवसाय करणार्यांची संख्या मोठी आहे. यासंबंधी जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना वारंवार सर्वे करण्याच्या आणि त्यानुसार बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आरोग्य अधिकार्यांच्या या सूचनांकडे बीडीओ आणि तालुका आरोग्य अधिकार्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत बोगस डॉक्टरांना अभय दिल्याचे दिसते. गुन्हे दाखल करा : तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करा. या मोहिमेसाठी आवश्यकता भासल्यास संबंधीत क्षेत्रातील पोलिस ठाण्याचीही मदत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका पेक्षा अनेक कारवाई नंतरही बोगस डॉक्टरांचे दवाखाने चालू राहतात कसे हा प्रश्न न सुटलेला आहे. परराज्यातील अनेक डॉक्टरांनी जत तालुक्यातील रुग्णांना आजाराच्या क्षमतेपेक्षा जादा पावरची औषधे देऊन विकंलाग केले आहे.जे रुग्ण आता त्यांच्या औषधाशिवाय बरेच होत नसल्याची उदाहरणे आहेत.
नविन फंडा
जत तालुक्यातील अशा परराज्यातील बोगस डॉक्टरांनी नवा फंडा सुरू केला आहे. परवाना धारक एकाद्या डॉक्टरांचा बोर्ड ,प्रमाणपत्राची झेराक्स दवाखाऩ्यात लावून व्यवसाय सुरू केला आहे. जत कारवाई झाली तर डॉक्टर बाहेर गेलेत मी कपाऊंडर आहे म्हणून सांगत आहेत. त्यामुळे पथकाच्या कारवाईलाही मर्यादा पडत आहेत.