जतचे कमल अर्थोपेडिक सेंटर ठरतयं रुग्णांना वरदान | कृत्रिम सांधारोपण,गुडघ्याच्या व खुब्याच्या शस्ञक्रियेची सोय

0
2

जत, संकेत टाइम्स: कृत्रिम सांधारोपण, गुडघ्याच्या व खुब्याच्या अशा अनेक  शस्त्रक्रिया व दुर्बिणीतून विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे जत येथील कमल अर्थोपेडिक सेंटर येथे झाल्या असल्याची माहिती डॉ.कैलास सनमडीकर यांनी दिली.

कमल अर्थोपेडिक रुग्णालयात चालू वर्षी अत्याधुनिक सर्व त्या यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. खुब्याच्या व गुडघ्याचा,सांध्याच्या बदलासाठी अद्यावत मशिनरी मॉड्युलर थिएटर, लामीनर एअर फ्लो व सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, व्हेंटिलेटर, डी फ्रेबिलेटर, मॉनिटर्स आदी सर्व मशिनरी युक्त ऑपरेशन थिएटर बनविले आहे.
पूर्वी गुडघ्याच्या सांध्याच्या व खुब्याच्या ऑपरेशन साठी जत तालुक्यातील रुग्णांना सांगली, कोल्हापुर, पुणे व मुंबई याठिकाणी जावे लागत होते. आता या सुविधा जतमध्ये उपलब्ध झाल्या असल्याने रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे.

कमल अर्थोपेडिक हे गेल्या 22 वर्षांपासून कार्यरत आहे. या रुग्णालयात महात्मा फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत 450 हुन अधिक शस्त्रक्रिया मोफत झाल्या आहेत. या रुग्णालयात सीटी स्कॅनचीही सोय करण्यात आली आहे. आत्ता थोड्याच दिवसांत अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन सुद्धा या रुग्णालयात ठेवले जाणार आहे.अत्याधुनिक दोन- दोन ऑपरेशन थिएटरची सोय फक्त या रुग्णालयात आहे. याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उमाजीराव सनमडीकर मेडिकल फौंडेशनचे विश्वस्त डॉ. सौ. वैशाली सनमडीकर यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here