आरपीआयच्या संख मधील मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ; संजय कांबळे, विकास साबळे

0
3

जत,संकेत टाइम्स : जत तालुका आरपीआय आठवले गट यांच्या वतीने जत तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना, जत साखर कारखान्यासह अनेक मागण्यासाठी संख येथील बाबा मंगल कार्यालयात बुधवार ता.१३ रोजी होत असलेल्या शेतकरी मेळाव्यास तालुक्यातील शेतकरी,नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केले आहे.

 

 

कांबळे, साबळे म्हणाले,जत तालुक्यातील जनतेला प्रस्तापित पक्ष,राज्यकर्त्यांनी जमेत धरले असून त्यांच्या राजकीय सोयीसाठी ते जनतेचा वापर करून घेत आहेत.मेळावे घेऊन जतचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासने ऐकून तालुक्यातील जनता विटली आहे.प्राथमिक प्रश्न सोडवू न शकलेले नेते खरचं शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवतील का असा प्रश्न आहे.त्यामुळे तालुक्यात सातत्याने विविध प्रश्नावर प्रभावी आंदोलने करून प्रशासन, राज्यकर्ते यांना सरळ करणाऱ्या आरपीआयच्या वतीने संखमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचे बुधवारी आयोजन केले आहे.

 

पुर्व भागातील पाणी योजनेपासून वंचित ६५ गावांना पाणी मिळावे,जत साखर कारखान्यात सभासद शेतकऱ्यांचे अधिकार परत मिळावे आरपीआयच्या तालुक्यातील फुटके रस्ते,डळमळीत प्रशासनाला वटणीवर आणणे,पिण्याचे पाणी,शेतकऱ्यांच्या विज जोडण्या,बेकायदेशीर विज कनेक्शन तोडण्या विरोधातात आवाज उठविण्यासाठी आरपीआयला आता बळ देण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील शेतकरी,नागरिक,शेतमजूरासह सामान्य नागरिकांचा आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत असून संखमधील मेळावा यशस्वी करू,असेही यावेळी कांबळे व सांबळे यांनी सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here