“अवैद्य” धंदे “जोमात” पोलीस “कोमात” एसपी साहेब लक्ष द्या..!

0
27

जत,प्रतिनिधी : जत,उमदी शहरासह जत तालुक्यात अवैद्य धंदे जोमात सुरु असून, पोलीस प्रशासन कोमात असल्याची टिका होऊ लागली आहे. भर दिवसा व राजरोस या धंद्यांना उत आला असून त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे या धंद्यांवर प्रशासनाचा वरदहस्त असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांकडून जनतेला काहीशा बदलाची आपेक्षा वाटू लागली. कारवाई हवी तडजोड नको. त्यांच्या धोरणाने जत तालुक्यात सर्व अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले होते. मात्र, त्यांच्याकडून भ्रमनिराश झाला की काय ? असा प्रश्न समोर येऊ लागला आहे.
विशेषत: आता तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. हा वचक मलिद्याची रक्कम वाढविण्यासाठी केलेली नौटंकी तर नव्हती ना ? असा प्रश्न जाणकार विचारु लागले आहेत. आता ऊत असलेल्या अवैध धंद्यांकडे खाकी जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे की काय ? अशा प्रकारचे सवाल सर्वसामान्य जतकरांमध्ये चालु आहेत.

 

जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारु,मटका, गांजा, तसेच मोठ्या प्रमावर जुगार अड्यांसह वाळु तस्करी वाढली आहे. बर्याचदा अशा खबरी लागुन देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप होत आहे. तसेच यासर्व दिनक्रमामागे मोठ्या प्रमाणावर होत असलेली “अर्थ”पुर्ण तडझोड असल्याची चर्चा देखील जतकर करत आहे. त्यामुळे, खाकीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून. याबाबत खुद्द पोलीस अधिक्षकांनी लक्ष घालणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here