दिवाळी खरेदीसाठी जतेत बाजार गजबजला

0
1

जत : चार दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी विक एंडला  दिवसभर ग्राहकांनी बाजार गजबजून गेला. फराळाचे साहित्य, आकाशकंदील, रांगोळी यासह कपडे खरेदीसाठीही गर्दी होती. गेला महिनाभर तेजीत असणाऱ्या कांद्याची आवक वाढल्याने दर उतरले आहेत.नागपूर परिसरातून संत्र्यांची आवक वाढली आहे. बटाटे-लसणाचे भाव स्थिर आहेत.

 

 

 

दरम्यान रविवारी बाजार पेठेत मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.
शनिवार (ता.14)पासून दिवाळीला सुरवात झाली आहे. त्यामुळेच दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार म्हणून खरेदीसाठी सकाळपासून बाजार गजबजून गेला. किराणासह भुसार साहित्य खरेदीसाठी दुकानात गर्दी होती. तयार फराळाचे स्टॉलही लागले होते. आकाशकंदील, विविध रंगांची रांगोळी, घर सजावटीचे साहित्य याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड दिसली.

 

 

आकाश कंदिलाचे 100 ते 1000 रुपयांपर्यंत दर होते. विविध प्रकारच्या विद्युत माळांचे 150 ते 700 रुपयांपर्यंत दर आहेत. तयार कपडे घेण्यासाठीही छोट्यांसह युवक-युवतींची लगबग सुरू होती.मंगळवार पेठ,नगरपरिषद रस्ता ग्राहकांनी फुलून गेला होता.भाजीमंडईत पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम आहेत. फळ बाजारातही दिवाळीमुळे उलाढाल वाढली. संत्र्याची आवक वाढली असून, 60 रुपये किलो असा दर आहे. डाळिंब, मोसंबी, पेरू,चिकूची आवक कायम आहे. देशी केळी 50 ते 60, तर वसई केळी 40 रुपये डझन आहेत.

फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा राज्य शासनाने आठवडा बाजाराला परवानगी दिली. मात्र, स्थानिक प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अद्याप येथील बाजाराला रीतसर मान्यता दिलेली नाही. तरीही आज दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीसाठी ग्राहकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून गर्दी केली. साहजिकच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. 

 

तयार फुलाच्या माळा आकर्षण
जत बाजार पेठेत यंदा‌ विविध प्रकारच्या पॉस्टिक मुलाच्या माळा आकर्षण ठरत आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या फुलाची मागणीला फटका बसण्याची शक्यता आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here