उमदीत पोलीसांनी दिला परवाना ?, अवैद्य धंद्याना उधान

0
4

जत : उमदी पोलीस ठाण्याच्या आशिर्वादाने परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे.गुंडाराज,अवैध दारू,मटका,सिंदी,जुगार,बेकायदा वाहतूक यासारखे अवैध धंदे खुलेआम सुरु असून याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखानी लक्ष द्यावे,अशी मागणी परिसरातील नागरीकातून होत आहे.जत,उमदी परिसरातील अनेक गावे सांगली पासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत.त्यामुळे या परिसरात नेमके काय चालते हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बहुधा माहिती नसते.

 

 

त्याचा गैरफायदा येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी घेत आहेत.उमदी पोलिस ठाणे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबादीत राखण्यासाठी या पोलिसांची नेमणूक शासनाने केली आहे.मात्र याकडे लक्ष न देता येथील अधिकारी व पोलिसांनी ‘मलिद्या’साठी चांगलाच राबता हंगामा सुरु केला आहे. त्यातून महिन्याकाठी लाखो रुपयांची मलिदा गोळा होत आहे.त्याच्या बदल्यात अवैद्य धंद्यांना एकप्रकारे परवानाच दिल्याची स्थिती आहे.

मटका जोमात

उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात मटका जोमात सूरु आहे दररोज लाखो रुपयांची उलाढाल या मटक्यातून होत आहे. पोलीस ठाण्यातील अनेक दिवसापासून तळ ठोकलेला पोलीस कर्मचारी या मटक्यावर चांगलेच नियंत्रण ठेवून आहेत.या मटक्या बुकी कडून महीन्याकाठी ठरलेली मलिदा वेळेत वसूल होत असलेने कारवाई करण्यास उमदी पोलिसाकडून टाळाटाळ होत आहे.

दारू शिंदीचा उंच्छाक

उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याबरोबर हातभट्टी दारू बनावट,पावडर युक्त शिंदीच्या विक्रीने उंच्छाक मांडला आहे.यातून देखील लाखो रुपयांची मलिदा गोळा होत आहे.
बेकायदा वाहतूक सुसाट
बेकायदेशीर वाहतूक रोकणारे पोलीस हप्ते वसूलीत व्यक्त असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजले आहे.हप्तेबाजीने बेकायदा वडाप वाहतून सुसाट सुरू आहे. जनावरांसारखी माणसे कोंबून वडाप होत आहे. हे रोकण्यासाठी नेमलेले कर्मचारी दररोज हाजारो रूपये गोळा करत असल्याचे बेधडक आरोप होत आहेत.

पोलीस ठाण्यासमोरच मटका

उमदी पोलीस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या स्टँडसमोर खुलेआम मटक्याची चिठ्ठी घेत आहेत.तर चहाच्या गाड्यावर बेकायदा दारूच्या बाटल्या विकल्या जात आहे.हे पोलीसांची चाणाक्ष याकडे जात नाही, हे विशेष..

गांजा,चंदन तस्करी सुसाट
जत पुर्व भाग व सीमावर्ती निर्जन असणाऱ्या पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गावात थेट पोलीसांच्या पांठिबा असल्याने शेकडो एकर गांजाची लागवड केली असल्याची चर्चा असून यातूनही पोलीसांना महिन्याला हप्ते मिळत असल्याची चर्चा आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here