जत,मच्छिंद्र ऐनापूरे :
वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले जत तालुक्यातील तीन विद्यार्थी युक्रेन या देशातून सुखरूप मायदेशी परतल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
जत तालुक्यातील यश मनोज पाटील (रा. बिळूर), वैष्णवी गणपती शिंदे ( तिपेहळळी) व यशराज पराग पवार ( रा. जत) हे विद्यार्थी वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी युक्रेन या देशात गेले होते. परंतु रशिया व युक्रेन मध्ये युध्द सुरू झाल्याने हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने त्यांचे पालक चिंतातूर व भयग्रस्त झाले होते.