दुसऱ्यांदा मुलगीच झाल्याने विहिरीत ढकलून पत्नीचा खून,निर्दयी पतीला अटक

0
1

 

दोन्ही मुलीच झाल्याच्या रागातून एका पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपूर याठिकाणी उघडकीस आला आहे.पत्नीला विहिरीत ढकलून देऊन पतीने हा खून करत अपघाताचा बनाव केला होता.मात्र पोलिसांनी छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.याप्रकरणी पती कौस्तुभ सरनोबत याला अटक करण्यात आली आहे.

 

 

इस्लामपूर याठिकाणी राहणाऱ्या कौस्तुभ सरनोबत (वय-३१,रा.- कोळी मळा,इस्लामपूर) याने आपली पत्नी राजनंदिनी सरनोबत( वय- २९) हीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.कौस्तुभ याचे आठ वर्षापूर्वी कोल्हापूरच्या बावडा येथील राजनंदिनीशी विवाह झाला होता.त्यांना दोन मुली झाल्या.मात्र दोन्ही मुली झाल्या याचा राग कौस्तुभ याच्या डोक्यात होता.याच रागाच्या पोटी कौस्तुभ यांनी आपली पत्नी राजनंदिनी हीचा विहिरीत ढकलून खून केला.

 

सुरुवातीला कौस्तुभ याने मॉर्निंग वॉक दरम्यान चालत असताना कापूसखेड हद्दीतील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका विहिरीत पाय घसरून पडून अपघाताने मृत्यू झाल्याचा बनाव केला होता.तशी फिर्याद देखील इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली होती.मात्र राजनंदिनीच्या माहेरच्या लोकांनी याबाबत आक्षेप घेत सदर प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

 

त्यानंतर इस्लामपूर पोलिसांनी पती कौस्तुभला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी आपल्या पत्नीला विहिरीत ढकलून खून केल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी कौस्तुभच्या विरोधात इस्लामपूर पोलिसांमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here