सांगली,संकेत टाइम्स : गजबलेल्या सांगली शहरात गुरूवारी दोन वेगवेगळ्या आगीच्या घटना घडली.यात सकाळी टिंबर एरिया नजिकच्या वखारीने पेट घेतला,या आग नियंत्रण मिळवत असतानाच इस्लामपूर रोडवर एका ट्रँक्चरने अचानक पेट घेतल्याने धावपळ उडाली.अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली
सकाळी टिंबर एरिया भागातील गणपती फर्निचर, लक्ष्मी ट्रेडर्स व हार्डवेअर आणि कृष्णा टिंबर डेपो या तीन व्यवसायाच्या ठिकाणी अचानकपणें आग लागली.महापालिका अग्निशमन दलाला वर्दी मिळताच ६ फायर इंजिन सह घटनास्थळी पोहचून तब्बल पाच तासानंतर आग विझवली.आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, उपअग्निशमन अधिकारी सुनिल माळी यांच्या सह २० जवानांनी कष्ट घेतले.घटनास्थळी उपायुक्त राहुल रोकडे, स्थानिक नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आणि अमर निंबाळकर यांनीही भेट देऊन पाहणी करत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.दरम्यान इस्लामपूर रस्त्यावर ट्रँक्टरने पेट घेतल्याने पळापळ झाली.