देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या
संख्येत वाढ होत असून सांगली जिल्ह्यातही रुग्ण हळहळू वाढत आहेत.तासगाव तालुक्यात शनिवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात सुदैवाने गेल्या काही दिवसात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता.मात्र तासगावमधिल रुग्णांच्या मृत्यूमुळे धोका वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसात देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली आहे. वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्या आहेत.
बालसंगोपन योजनेत एकल पालकांच्या मुलांना मिळतात दर महिन्याला २२५० रुपये सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
राज्यांना आवाहन करुन लोकांची रोगप्रतिकारशक्ती
वाढवण्यावर भर द्यावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले आहे.सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवस रुग्ण वाढत आहेत.रुग्ण वाढीचा रेट १० टक्केवर आहे.शनिवारी अँन्टीजेन चाचणीत 21 रुग्णांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले.
सोसायटी शिपायाचा असाही प्रामाणिकपणा,शेतकऱ्यांची १ लाख ५८ हजाराची रक्कम दिली परत वाचा एका क्लिकवर सविस्तर वृत्त
त्यामध्ये एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. हा रुग्ण खानापूर तालुक्यातील आहे.शनिवारपर्यत जिल्ह्यात 48 रुग्ण उपचार घेत आहेत.रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण आढळत असले तरी कोणाचा मृत्यू झाला नव्हता.परंतू तासगाव तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
विजय ताड खून प्रकरणातील उमेश सावंत यांची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस सविस्तर वृत्त येथे क्लिक करा