सोसायटी शिपायाचा असाही प्रामाणिकपणा,शेतकऱ्यांची १ लाख ५८ हजाराची रक्कम दिली परत

0
डफळापूर येथे सोसायटी कर्जाची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरण्यासाठी चाललेल्या एका शेतकऱ्यांची १ लाख ५८ हजार रूपयाची रोखड सोसायटी ते बँक या रस्त्यावर पडली होती.ती सोसासटीचे शिपाई संभाजी शिंदे यांचा मुलगा गंगाधर याला सापडली.मुलगा गंगाधर यांनी ते वडिल संभाजी यांच्याकडे दिली.संभाजी शिंदे यांनी ती रोखड प्रामाणिकपणे सर्व सेवा सोसायटीत संबधित शेतकऱ्याला आणून दिली.

बेंळूखीतील वृध्दाला आडव्या डोंगराजवळ मारहाण करून लुटले

अधिक माहिती अशी,मार्च एंड मुळे ३१ तारखेला सोसायटीची थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरू होती.डफळापूर येथील सोसायटीचे सभासद असलेल्या एका शेतकऱ्यांने सोसायटी येथे हिशोब करून ते पैसे जिल्हा बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरून जात असताना सोसायटी ते जिल्हा बँकेच्या दरम्यान ग्रामपंचायतीसमोर पैशाची बँग व कागदपत्रे पडली.ती बँग डफळापूर सोसायटीचे शिपाई संभाजी शिंदे यांच्या मुलगा गंगाधर याला सापडली होती.

शेतकऱ्यांना विहिरीसाठी लाच मागितली म्हणून सरपंचाने असे काही केले की,व्हिडिओ तूफान व्हायरल

त्याने ती वडील संभाजी शिंदे यांच्याकडे दिली.त्यांनी त्यातील कागदपत्रावरून ते पैसे त्या शेतकऱ्यांची असल्याचे लक्षात येताच सोसायटीत असलेले शेतकरी यांना शिपाई शिंदे यांनी प्रामाणिक पणे ते पैसे परत दिले.त्यांच्या या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले.पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्याहस्ते ती रक्कम संबधित शेतकरी यांना परत देण्यात आली.यावेळी माजी चेअरमन मनोहर भोसले,सचिव राजू कोळी, सतिश शिंदे,दत्तात्रय कुंभार उपस्थित होते.

डॉक्टरांना १५ लाखांच्या खंडणीची मागणी,तिघाविरोधात गुन्हा दाखल

डफळापूर ग्रामपंचायतीसमोर साडलेले १लाख ५८ हजार रूपये प्रामाणिकपणे परत दिल्याबद्दल संभाजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.