निधीसह योजना आहे, पण पात्र व्यक्तीस त्याचा पत्ताच नसतो. योजनेवर मग पाणीच फेरले जाते. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने “जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची” हा उपक्रम सुरू केला आहे. १५ एप्रिल ते १५ जून दरम्यान अधिकारी संबंधित योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी एकाच छताखाली बसतील. जिल्हा व तालुकास्तरीय जनकल्याण कक्ष तयार होणार असून, त्यात लाभार्थ्यांची यादी तयार करीत अर्ज भरून घेण्याचे काम चालेल.
SSC-HSC Results : तारखा जाहीर झाल्या ,१० वी,१२ वीचा निकाल या तारखेला लागणार | जाणून घ्या
गतिमान निर्णयाला आता वेगवान अंमलबजावणीची जोड…
प्रत्येक जिल्ह्यात 'शासकीय योजनांची जत्रा' होणार…
किमान ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार…#शासकीय_योजनांची_जत्रा #महासंकल्प pic.twitter.com/o9hIHCjPYM— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2023
प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कागदपत्रांसह हेलपाटे घालावे लागण्याची बाब नवी नाही. आता शासनासही ते पटल्याचे मान्य झाले. सदर उपक्रम त्याचेच द्योतक ठरावे.
साठेखत नेमका काय आहे प्रकार ?,कसा मिळतो मालकीहक्क वाचा सविस्तर
प्रत्येक जिल्ह्यात शासकीय योजनांची जत्रा ; ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा #महासंकल्प #शासकीय_योजनांची_जत्रा pic.twitter.com/nqkFeLprRk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2023