महाराष्ट्रात विदर्भात सुर्य कोपला असतानाचं सांगलीच्या कमाल तापमानातही मोठी वाढ झाली आहे.जत,आटपाडीत तापमान कायम जादा राहते,यंदाही उन्हाच्या तीव्रतेने नागरिक हैराण झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी पारा चाळीशीच्या घरात पोहचला आहे.नोंदीनुसार मंगळवारी सांगलीत कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस नोंदविले आहे.उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक घराबाहेर पडणे मुश्किल झाले,असून येत्या आठवडाभरात तापमान चाळीशी पार होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
विजेचा शॉक लागून उमराणी येथील विवाहितेचा मृत्यू
गेल्या काही दिवसात किमान तापमानही २४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. सरासरीपेक्षा दोन अंशाने हे तापमान वाढ आहे.यापुर्वी जिल्ह्यात २७ एप्रिल २०१९ मध्ये सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.यंदाही तेथेपर्यत पारा पुढील काही दिवसात पोहचण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर तापमान चाळीशीच्या आसपास राहणार आहे.उन्हापासून सतर्क राहण्याची गरज आहे.उष्माघाताचा धोका बळावण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
• स्वस्तात मरणाची ‘झिंग’ गल्लोगल्ली पोहचली | लहानगे,प्रौढही आहारी,ग्रामीण भागात धुमाकूळ
• श्रीपती शुगरकडून संपूर्ण ऊसबिल जमा
• स्व:ताचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा वॉटस्अपवर स्टेट्स,अन् गळफास घेत तरूणांची आत्महत्या