जत तालुक्यात म्हैसाळ लाभ क्षेत्रात पाणी सोडण्याचे आदेश | वाचा सविस्तर..

0
3

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बैठकीमध्ये जत तालुक्यात सद्य सुरु असलेल्या आवर्तनामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या यावर सर्व अधिकाऱ्यांसमोर शेतकरी आणि संबंधित गावातील गावकरी यांची बैठक घेतली सध्या सुरु असलेल्या आवर्तनाच्या पाण्याचा डिस्चार्ज वाढवणेच्या सूचना करून दोन दिवसात म्हैसाळ पाणी योजनेचे सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेल असे नियोजन करण्यास सांगितले.

आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील सर्व विभागाच्या कामाचा आढावा घेतला.वीज वितरण कंपनी,मृद व जलसंधारण,म्हैसाळ उपसासिंचन योजनेचे सर्व विभाग,पाटबंधारे शाखा जत आणि संख एस.टी.महामंडळ,क्रीडा विभाग यांची दिवसभर मॅरेथान बैठका घेतल्या.
जलसंधारणाच्या प्रलंबित प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून चालू प्रकल्पाचा आढावा घेतला.तसेच नवीन नियोजित /नवीन योजनांचा आढावा घेऊन नवीन कामे सुचविणे बाबत सूचना केल्या .जलसंधारणाच्या मंजूर ९५ कोटींच्या कामांचा आढावा घेतला.तसेच पूर्वीच्या आणि नवीन तलाव आणि इतर जलसंधारण कामामध्ये जमिनी घेलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई यावर चर्चा करून मार्ग काढणेत आला.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बैठकीमध्ये जत तालुक्यात सद्य सुरु असलेल्या आवर्तनामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या यावर सर्व अधिकाऱ्यांसमोर शेतकरी आणि संबंधित गावातील गावकरी यांची बैठक घेतली सध्या सुरु असलेल्या आवर्तनाच्या पाण्याचा डिस्चार्ज वाढवणेच्या सूचना करून दोन दिवसात म्हैसाळ पाणी योजनेचे सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेल असे नियोजन करण्यास सांगितले.
क्रीडा विभागाच्या बैठकीमध्ये क्रीडा  संकुल मैदान जत येथे रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर वाढल्याने पोलीस गस्त घालणे सूचना केल्या.क्रीडा संकुल मैदानावर पिण्याच्या पाण्याची सोय करणेचे ठरले.मैदानात अडसर ठरणारे विजेचे पोल शिफ्ट करून जत-सांगली रस्तालगत मंजूर संरक्षण भिंतीच्या कामास तात्काळ सुरु करणेस बांधकाम विभागास सूचना केल्या.क्रीडा संकुलावर सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात उन्हाळी कॅम्पचे  आयोजन करण्यावर चर्चा झाली त्यावर क्रीडा शिक्षकाची नेमणूक करून स्वयंसेवी संस्था,सीएसआर निधींच्या माध्यमातून उन्हाळी कॅम्पचे आयोजन करण्याचे ठरले.
आ.विक्रमसिंह सावंत यांनी विक्रम फौंडेशनही या उन्हाळी कॅम्पसाठी मदत करेल असे सांगितले.क्रीडा संकुलावर लांबउडी ,बास्केटबॉल हॅडबॉल आदिचे मैदान सुरु करण्याचे ठरले.एस.टी.महामंडळाच्या जत आगारातील विविध समस्यांच्या आढावा आ.सावंत यांनी घेतला यावेळी जत आगाराच्या अधिकाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या या समस्या निश्चित सोडवण्यात येथील असे आ.सावंत यांनी सांगितले.जत तालुक्यातील महत्वाच्या मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याचे आ.सावंत यांनी सूचना केल्या.त्यावर लवकरच नवीन २५ बसेस जत आगारास उपलब्ध होणार असून वाढीव फेऱ्यांचे नियोजन केले.

 

आ.सावंत  यांनी जत-चेंबूर वाळेखिंडी मार्गे व आंवढी मार्गे करण्याच्या सूचना केल्या.एस.टी.आगारातील पिण्याच्या पाण्याची समस्येवर वाढीव कनेक्शन देणेस मुख्याधिकारी यांनी  सूचना केल्या.तसेच लवकरच फिल्टरची व्यवस्था करण्या येईल असे आ.सावंत यांनी सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here