गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामुळे तमाशा कलावंत अडचणीत

0
3
गावागावात होणाऱ्या तमाशा कलावंताकडूनही प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या सारख्या कार्यक्रमाची प्रेक्षकांकडून होणाऱ्या मागणी होत आहे.परिणामी तमाशा कलावंत यावर नाराजी व्यक्त करत आहेत. प्रेक्षकांना गण गवळण, बतावणी, विनोद आणि वग हे कार्यक्रम नको झाले असून तोकड्या कपड्यातील हातवारे करत होणारी गाणी, डान्सची अपेक्षा केली जात आहे, अशा शब्दात कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 सबसे कातिल गौतमी पाटील,बघा हटके ‘का’ति’ल’ व्हिडिओ

गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुफान राडा, नोटांची उधळण होत असते. गौतमी आपल्या नृत्याला अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप तिच्यावर अनेकांनी केला होता. पण तरीही तिच्या नृत्याची क्रेझ मात्र कायम आहे.

 

गौतमी पुन्हा आरोपाच्या फेऱ्यात,या प्रसिद्ध किर्तनकारांने केली टिका | गौतमीला तीन गाण्यासाठी ३ लाख,मात्र आम्ही ५ हजार मागितले तर होता आरोप

या अशा प्रकारच्या मागण्यांमुळेच तमाशा संपण्याच्या मार्गावर आहे.अश खंत तमाशा फड मालक व कलाकरांनी व्यक्त केली आहे.
सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत असलेल्या नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामुळे सध्या तमाशा कलावंत कमालीचे हैराण झाले आहेत. गौतमी पाटील जसा डान्स आणि हावभाव करते तसंच आम्ही देखील करावं, अशी मागणी तमाशा ठरवतानाचं संयोजकाकडून केली जात आहे.
तमाशा ही एक कला आहे,गौतमी पाटीलकडून सादर होणारा कार्यक्रम तमाशा नसल्याचेही सांगितले जाते.मात्र तमाशातदेखील प्रेक्षकांकडून गौतमी पाटीलचे व्हिडिओ दाखवले जातात आणि त्याच पद्धतीच्या डान्स व्हावा ही अपेक्षा प्रेक्षक आमच्याकडून व्यक्त करत आहेत.

 गौतमी पाटील लग्नाच्या विषयावर काय म्हणाल्या,पहा व्हिडिओतून

गौतमी पाटील नेहमीच आपल्या नृत्यामुळे चर्चेत असते. ‘सबसे कातील गौतमी पाटील’, अशी गौतमीची ओळख आहे. अल्पावधीतच तिने आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं आहे.नृत्यांना वेड लावल्यानंतर नृत्यांगणा आता अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा ‘घुंगरु’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 नवऱ्यांचा नादचं खुळा,बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी

प्रेक्षकांना फक्त गौतमी पाटील सारखा डान्स हवा आहे.त्यामुळे तमाशा लोप पावत चालला असल्याची खंत तमाशा कलावंतांनी व्यक्त केली आहे.गौतमीच्या सारखी अशीच मागणी राहिली तर तमाशा हा तमाशा राहणार नाही तर ऑर्केस्ट्रा होईल आणि तमाशा कायबाह्य होईल, अशी भीती कलाकारांनी व्यक्त केली आहे.
गौतमीने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावांमधील तरुणांना भूरळ घातली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here