जतचे प्रसिध्द डॉक्टर बनले तीन पिढ्याचे डॉक्टर | आजीपासून नातीपर्यतचा जन्म एकाच हॉस्पिटलमध्ये

0
4
आजीपासून नातीपर्यंत तिघींचा जन्म आरळी हाॅस्पीटलमध्ये
जत: पश्चिम महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रामधील किमयागार जत व मिरज येथील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर रवींद्र यांच्या नावावर आणखी एक विक्रम प्रस्थापित झाला आहे.एकाच कुटुंबातील चार पिढ्यांचे ते डॉक्टर बनले आहेत. तर आजीपासून नातीपर्यंत सर्वांचा जन्म त्यांच्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे.
जत तालुक्यातील बागेवाडी येथील मंगल तातोबा सरगर यांचे बाळंतपण डॉ.रवींद्र आरळी यांनी केले होते.त्यांना सिंधू नावाची मुलगी झाली सिंधू यांचा विवाह मिरवाड ता.जत येथील उत्तम सवदे यांच्याशी झाला. सिंधू हिचे बाळंतपण ही डॉ.रवींद्र अरळी यांनी केले.

 

त्यांना काजल नावाची मुलगी झाली‌‌.काजलचा विवाह बागेवाडी येथील अनिल चौगुले यांच्याशी झाला आहे. आता काजलचे बाळंतपणही डॉ.रवींद्र आरळी यांनी केले आहे. आजीपासून नातीपर्यंत तीन पिढ्यांचे बळतण डॉ. रवींद्र अरळी यांनी केले. अशा पध्दतीने ते चार पिढ्यांचे डॉक्टर बनले आहेत.डॉ. रवींद्र आरळी जत तालुक्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here