डफळापूर येथे गावडे डेन्टल क्लिनिक, इंप्लांट सेंटरचे रविवारी उद्घाटन

0
4

डफळापूर : डफळापूर येथील डेंटल सर्जन डॉ.रोहित साहेबराव गावडे यांच्या गावडे डेन्टल क्लिनिक व इंप्लांट सेंटरचे डफळापूर येथे शनिवार ता.६ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

डफळापूर येथील वैद्यकीय दांपत्य असलेले डॉ.साहेबराव गावडे व माजी सभापती डॉ.देवयानी गावडे यांचे डॉ.रोहित गावडे हे चिंरजिव आहे.सोलापूर ‌येथे बीडीएस शिक्षण पुर्ण केल्यानंतर डॉ.रोहित यांनी पुणे येथील नामवंत डेंटल हॉस्पिटल मध्ये काम केले आहे.अत्याधुनिक उपचार पध्दती,मशनरी डॉ.गावडे डेन्टल क्लिनिक व इंप्लांट सेंटर येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत.उच्च श्रेणीचे दातांच्या विविध आजारावर येथे उपचार मिळणार आहेत.

 

डफळापूर येथील राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर हे क्लिनिक सुरू होत आहे.शनिवारी ता.६ रोजी सायकांळी ५.०० वाजता या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.किमया डेंटल क्लिनिक भोर(पुणे)डेंटल सर्जन डॉ.विरेश बिराजदार,डेंटल सर्जन डॉ.सचिन मजती(मिरज)यांच्या शुभहस्ते तर श्वास हॉस्पिटलचे डॉ.अनिल मडके(सांगली),जतचे स्ञीरोग तज्ञ डॉ.रविंद्र आरळी यांच्या प्रमुख उपस्थितीत तर इंजि.विशाल सुतार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे.

यांचा डफळापूर परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन, डॉ.साहेबराव गावडे,डॉ.देवयानी गावडे,डॉ.युवराज गावडे यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here