सांगली : देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आज सुरू झाली. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून चार जून रोजी सर्व टप्प्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे.देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या.
पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी, सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
आचारांहिता सुरवात :- 16 मार्च
नामनिर्देशन :-12 एप्रिल
उमेदवारी अर्ज मागे घेणे :- 19 एप्रिल
उमेदवारी अर्ज छाननी :-20 एप्रिल
उमेदवारी अर्ज माघारी घेणे :- 22 एप्रिल
मतदान :-7 मे
ही निवडणूक सात टप्प्यात होणार आहे.देशात निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी होणार मतदान होणार आहे.मतदान देशात 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला करणार मतदान,दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार 26 एप्रिल ला,तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार 7 मे तर चौथ्या टप्प्यात 13 मे ला,पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे तर सहाव्या टप्प्यातील मतदान,सातव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी होणार