सांगली : म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्याकरिता व सर्व लाभधारकांना सम प्रमाणात पाणी वाटप होण्याकरिता जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील
जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या कालव्यावरील कार्यक्षेत्रातील, बिळूर कालवा भाग 1 व 2 वरील कार्यक्षेत्रातील देवनाळ कालवा भाग 1 व 2 वरील कार्यक्षेत्रातील आबाचीवाडी, अचकणहल्ली, अमृतवाडी, अंकले, अंतराळ, आवंढी, बाज, बनाळी, बागेवाडी, बिळूर, बिळूंकी, बिळनार, डफळापूर, देवनाळ, धावाडवाडी, डोरली, एकुंडी, घोलेश्वर, गुळवंची, गुगवाड, हिवरे, जाडरबोबलाद, जत, जिरग्याळ, कंठी, काराजंगी, खैराव,
खलाटी, खिल्लारवाडी, खोजणवाडी, कोसारी, कुंभारी, कुणीकोणूर, कूडणूर, लकडेवाडी, लोहगाव, माडग्याळ, मल्ल्याळ, मायथळ, मेंढेगिरी, मिरवाड, मोकाशेवाडी या गावांमध्ये कालव्या लगतच्या दोन्ही काठापासून 200 मीटर अंतरावर दि. 11 एप्रिल रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 31 मे 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास तसेच एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही.