तालुक्यातील प्रत्येक नागरिक समृध्द करण्याचा प्रयत्न करणार | आमदार गोपीचंद पडळकर ;  डफळापूर विभागात आभार दौरा

0
564

जत : डफळापूर विभागातील खलाटी, मिरवाड, शेळकेवाडी, शिंगणापूर, कुडनूर, डफळापूर, बेळुंखी, बाज, कंठी, डोर्ली या गावांना नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदाराचा आभार दौऱ्यावर केला.यावेळी प्रत्येक गावातील समस्या,लोकांच्या अडचणी आ.पडळकर यांनी जाणून घेतल्या.

जत तालुक्यात राजकीय अभिनिवेश बाजूला सारत त्यांनी सुरवातीलाच घोषणा केली होती, इथला दुष्काळ इथली बेरोजगारी आपला शत्रू आहे. इथला कोणताच नेता आपला विरोधक नाही तर राजकीय मतभेद असतात.अगदी बोलल्याप्रमाणे आ.पडळकर जतच्या पाण्यासाठी त्यांच्या आवर्तनासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत.

जत तालुक्याच्या जनतेत पेरलेला विश्वास उदंड पीक देऊन गेलाय. आता लवकरच वेगवेगळ्या गटांचा दौरा होईल आणि याच आभार दौऱ्यात लोकांच्या मागण्या अडचणी समजून घेत सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.जत च्या जनतेने सन्मानपूर्वक जनतेतून समोरचा दरवाजा मोडून मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल त्यांनी नेहमी इथल्या जनतेबद्दल आ.पडळकर यांनी ऋण व्यक्त केले आहेत.

डफळापूर विभागातील गावागावात आ.गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here