राज्याभिषेक ही इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना ; मदगोंड सुसलाद

0
4



भिवर्गी,संकेत टाइम्स : भिवर्गी (ता.जत)येथे स्वराज्य गुढी उभारून शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच मदगोंड सुसलाद यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सदस्य राजकुमार कांबळे, माजी सरपंच रामगोंडा बिराजदार, पोलीस पाटील श्रीशैल चौगुले, युवा नेते बाळासाहेब सुसलाद, कुमार पाटील, प्रकाश चौगुले, अप्पासाहेब चौगुले,नागेश चलवाधे, संतोष होनमोरे,अनील कोळी उपस्थित होते.







सरपंच मदगोंड सुसलाद म्हणाले की,

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे.

शिवरायांचा आदर्श समोर ठेवून जीवन जगणे म्हणजे खरी शिवजयंती साजरी करणे होय. 






उप सरपंच बसवराज चौगुले म्हणाले की, ज्याप्रमाणे शिवरायांवर श्रीराम,कृष्ण आणि संताच्या चरित्राचे संस्कार झाले. शिवाजी महाराजांच्या मनात जनतेबाबत असलेल्या कळवळ्यामुळे त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली होती. हा इतिहास महाराष्ट्रातील लहान मुलांच्या बालमनात बिंबवला गेला तर त्यांच्या मनातही नकळत राष्ट्रप्रेम आणि भक्ती निर्माण होईल. शिवाजी राजांप्रमाणेच लहान वयात आयुष्यात काही तरी चांगलं घडवण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल.



भिवर्गी ता.जत येथे शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here