होमगार्डसाठी इच्छुक उमेदवारांना नोंदणीसाठी 14 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
10

सांगली : सांगली जिल्हा होमगार्डमधील रिक्त असलेल्या 632 जागा भरण्याकरीता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून पोलीस अधीक्षक कार्यालय, कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सांगली येथे केले आहे. त्याकरिता दि. 14 ऑगस्ट 2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. होमगार्डमध्ये सेवा करु इच्छित असलेल्या सांगली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करीता अर्ज करावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक रितु खोखर यांनी केले आहे.

 

होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या अनुषेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड यांना राहील, असे जिल्हा समादेशक, होमगार्ड कार्यालय सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here