जत : अचकनहळ्ळी (ता. जत) येथे गावातील महिलांसाठी अक्कलकोट, तुळजापूर, आणि पंढरपूर या पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या भक्तीभावाचा सन्मान राखत आणि त्यांच्या सोयीसाठी आम्ही ही विशेष व्यवस्था केली आहे.
या उपक्रमामागील उद्देश हा महिलांना त्यांच्या श्रद्धास्थानांच्या दर्शनासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. आपल्या माता-भगिनींच्या सुख-समृद्धीसाठी आणि धार्मिक श्रद्धा जपण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
भविष्यातही अशा प्रकारच्या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांद्वारे आपल्या समाजाची सेवा आणि सहकार्य करत राहू,असे आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले.