महामारीतही लाचखोरी जोरात; महसूल सर्वांत पुढे

0
2



जत,संकेत टाइम्स : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वारंवार संचारबंदी जाहीर केल्यामुळे उद्योग, व्यवसाय व शासकीय कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे महामारीमुळे सर्व काही ठप्प असताना दुसरीकडे मात्र लाचखोरी जोरात सुरू असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.कार्यालये बंद असतानाही अनेक कार्यालयात कामे सुरू आहेत.पैसे देणाऱ्यांचे तेवढे काम केले जाते,अन्य नागरिकांना ऑफिस बंद‌ असल्याचे सांगण्यात येत आहे.

जत महसूलच्या सर्व विभागाला वरकमाईची लागण झाली आहे. साध्या कोतवाला पासून तलाठी,मंडल अधिकारी, कार्यालयातील शिपाईपासूनचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा डोळा कमाईकडे असल्याचे सातत्याने आरोप होत आहेत.

सध्या जत तालुक्यात नोंदीचा मोसम सुरू असून चांगले उत्पन्न देणारे नोंदीचा हंगाम सध्या जोमात असून अगदी दहा वीस वर्षापासून रखडलेल्या नोंदीही तलाठी,मंडल अधिकाऱ्यांकडून आता वजन ठेवल्याने गतीने घालण्यात येत आहेत.गौण खनिज,महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार जमिन नोंदीच्या कामात सध्या आलेली गती बरचं काही सांगून जात आहे.



तहसीलला भ्रष्टाचाराची किड


जत तहसील कार्यालयाला भ्रष्टाचाराची किड फार जूनी असून सध्या तालुक्यात सध्या वाळू तस्करी जोमात असून एक कनिष्ठ लिपिकाच्या सानिध्यात असलेले अनेक वाळू तस्कर राजरोसपणे वाळू तस्करी करण्यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

तर कोरोना काळात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार होणारी कामे नेमकी आताच कशी घाई गडबडीत केली जात आहेत,असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here