भीषण अपघात कार- ट्रक धडकेत एकाच‌ कुंटुबांतील चौघांचा जागीच मृत्यू

0
420

कार-ट्रकची धडक होऊन भीषण अपघाताची घटना घडली आहे.कार आणि आयशरचा मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी अंत झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.लातूरच्या उदगीर तालुक्यात ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे.

या भीषण अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या भीषण घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात कार आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची भीषण घटना घडली आहे. उदगीर तालुक्यातील वाढवणाच्या एकुरका येथील मंदिराजवळ या वाहनांचा अपघात झाला आहे.कारमध्ये प्रवास करत असलेल्या चौघांचा जागीच दुर्दैवी अंत झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांमध्ये तीन महिलांसह एका चिमुकलीचा समावेश आहे.अपघातात मृत्त झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एकुर्का येथील जाधव कुटुंबीय आपल्या स्विफ्ट कारने खरेदीसाठी उदगीरला जात होते. यावेळी नांदेड- बिदर महामार्गावर प्रंचड वेगात आयशरने स्विप्ट कारला जोरदार धडक दिली.या भयंकर अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.उदगीर तालुक्यातील मंगल जाधव,ज्योती भेंडे, प्रणिता बिरादार अशी मृतांची नावे असून एका चिमुकलीचाही समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here