आरळी हॉस्पिटलमध्ये केरळा थेरपी सेंटर सुरु होणार

0
436

जत : जत येथील शांताबाई शिवशंकर आरळी हॉस्पिटलमध्ये दि. ९ जानेवारी पासून केरळा थेरपी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरचे उद्घाटन आ. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच दि. ८ व दि. ९ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्त्रीरोगतज्ञ डॉ. रविंद्र आरळी, डॉ. रेणुका आरळी यांनी दिली. केरळा थेरपी सेंटरमध्ये सर्व रोगांवर केरळा थेरपी आयुर्वेदिक उपचार व सल्ला देण्यात येणार आहे.

रक्तमोक्षण, मसाज थेरपी, कटी बस्ती, अग्नी कर्म, नस्य, नेत्र तर्पण, पिंड स्वेदन, शिरोधारा, तक्रधारा, कोलोन हायड्रोथेरीपी, स्पेशल हिमालया साल्ट रॉयल सोनाबाथ करण्यात येणार आहे. दोन दिवसीय शिबिरात पुणे व मिरज येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. रोहित सांगोलकर, रोहन सांगोलकर यांच्याशी यासंदर्भात अडचणी असल्यास संपर्क साधावा असे आवाहन डॉ. आरळी यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here