बाज गणातून संध्या मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल

0
55

जत : जत पंचायत समितीच्या बाज गणातून सौ.संध्या तुकाराम (पिंटू) माने यांनी आज आपले नामांकन अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टी तसेच अपक्ष अशा दोन्ही स्वरूपात अर्ज सादर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नामांकन प्रक्रियेदरम्यान त्यांच्या समर्थकांची उपस्थिती लक्षणीय होती. स्थानिक विकास, महिला सक्षमीकरण व मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दुहेरी अर्जामुळे बाज गणातील निवडणूक लढतीत नव्या घडामोडींना वेग आला असून, पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here