आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय, जत येथे दरीबडची जिल्हा परिषद गटातील विविध गावांमधील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. ग्रामीण भागातील नेतृत्वाने एकत्रितपणे भाजपवर विश्वास व्यक्त केल्याने जत तालुक्यातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या प्रवेश सोहळ्यात सरपंच शिवानंद मोर्डी, उपसरपंच बहिरू मुंजे, चेअरमन संजय मोरडी, मल्लिकार्जुन पुजारी, श्रीशैल पुजारी, गुरुपाद बसर्गी, उपसरपंच धुंडाप्पा मल्लाड, ग्रामपंचायत सदस्य विठोबा ऐवळे, राजेंद्र नागठाण, राकेश शिंगे, विकास मोरडी, पिंटू स्वामी, संजय माळी, शिवनिंग जामगोंड, पिंटू जामगौंड, मंतेस मदभावी, बाबगोंडा पाटील, शिवानंद स्वामी, राजाराम ऐवळे, लक्ष्मण बसर्गी, राजेंद्र मोरडी, ईश्वराया स्वामी, कुमार बसर्गी, पिराप्पा बसर्गी, बसगोंडा बसर्गी, अंबाजी माळी, सुखदेव माळी, संजय माळी तसेच धुळकरवाडीचे सरपंच अनिल माळी, भिमगोंडा माळी व माजी सरपंच प्रकाश बन्नूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ.रवींद्र आरळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नगरसेवक परशुराम मोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवप्रवेशी कार्यकर्त्यांचे स्वागत करून पक्षाची विकासाभिमुख भूमिका व संघटनात्मक ताकद याविषयी मार्गदर्शन केले.
हा जाहीर प्रवेश म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विकास, विश्वास आणि सुशासनाच्या विचारधारेवर जनतेने व्यक्त केलेला ठाम विश्वास असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नवप्रवेशी कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातून जत तालुका व परिसराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला.
दरिबडची ता.जत येथील सरपंच,उपसरपंचसह पदाधिकाऱ्यांचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याचे भाजपात स्वागत केले.




