आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी

0
8

मिरज : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार इद्रिस नायकवाडी यांना समान नागरी कायद्याला विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांनी मिरज शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आमदार नायकवाडी यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून समान नागरी कायद्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे नमूद करत, आगामी हिवाळी अधिवेशनात या कायद्याशी संबंधित विधेयक मांडले जाण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाची भूमिका जाहीर करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, या भूमिकेनंतर त्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अदखलपात्र नोंद केली असून, पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती दिली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here