रावळगुंडवाडीत घरफोडी; ३.२५ लाखांचा ऐवज चोरीला

0
0

जत : जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि ९५ हजारांची रोकड असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २० नोव्हेंबर पहाटे ते २१ नोव्हेंबर सकाळदरम्यान घडली.

रमेश ढुंडाप्पा हिरगोंड हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. लोखंडी तिजोरी उचकटून त्यातील सोन्याच्या तीन अंगठ्या, चांदीचा लक्ष्मी मूर्तीचा मुकुट, ब्रेसलेट, पात्र आणि ९५ हजारांची रोकड चोरून नेली.

याप्रकरणी रमेश हिरगोंड यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here