संख : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भामुळे अर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. अशा अवस्थेत जत तालुक्यातील पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी वाढदिवसानिमित्त आसंगी तुर्क येथील मॉडेल स्कूल या शाळेला 5 हजाराची अर्थिक मदत केली आहे. दुष्काळग्रस्त भागात विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याची जाणीव ठेवून मॉडेल स्कूलाला अर्थिक मदत केली आहे.
दिलीप वाघमारे हे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील आहेत. जत तालुक्यात शिक्षक म्हणून आल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागला. सध्या त्यांची नेमणूक बाबरवस्ती या आयएसओ मानांकीत शाळेत आहे.
समाज ऋणातून थोडंस उतराई व्हावे. गोरगरिबांची मुलेच जिल्हा परिषद शाळेत शिकत असतात.शाळेतील मुले ही आपलीच आहेत, असा उदात्त हेतू मनात ठेवून यंदाच्या वाढदिवशी कोरोनाच्या संकटचा सामना करत असलेल्या समाजातील इतर घटकांना सकारात्मक संदेश देत वाघमारे यांनी ही आर्थिक मदत केली आहे.
दिलीप वाघमारे सांगतात, मी केलेली अर्थिक मदत या भागातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी, किंबहुना त्यांना शैक्षणिक साधने उपलब्ध व्हावी,अशा मदतीचा आदर्श घेऊन अन्यही दानसुराचे अनेक हात पुढे यावेत,यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे.अनेक जण वाढदिवसा सारख्या कार्यक्रमावर विनाकारण पैसे खर्च करतात.तसे पैसे वाचवून देशाचे उद्याचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थी घडविणाऱ्या शैक्षणिक मंदिराना मदत रूपांत द्यावी.,अशा छोट्याशा मदतीने दुर्लक्षित,तालुकात शैक्षणिक क्रांतीची ज्योत फलत राहिल.
यावेळी रामचंद्र राठोड,तानाजी वाघे,मनोज खोकले,नामदेव जानकर, मुख्याध्यापक शंकर शिंगाडे,सुभाष गेजगे, शिवाजी गायकवाड,अभिजित माळगोंडे,फिलिप कोकणी,चंद्रकांत राऊत,बागुल जयराम, सुनिल अहिरे, चौधरी विलास,खुपसे बालाजी,राजेंद्र हड्याळ आदी उपस्थित होते.
आदर्श,उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे मदतीचा चेक देताना