जत,संकेत टाइम्स : 20 वर्षीय पिडीतेवर मोबाईलवर फोटो काढून ते सर्वांना दाखविण्याचे व जीवे मारण्याची धमकी देत पिडितेच्या इच्छेविरूध विविध ठिकाणी दोन वर्षापासून वारवांर शरिरसंबध ठेवल्याप्रकरणी सोन्याळ,ता.जत येथील तरूणाविरोधात उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.रेवनसिध्द विठ्ठल बिराजदार,(रा.सोन्याळ)असे गुन्हा दाखल तरूणांचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,पिडितेच्या ओळखीचा फायदा घेत संशयित रेवनसिध्द बिराजदार यांने मोबाईलवर फोटो काढून ते सर्वांना दाखविण्याचे व जीवे मारण्याची धमकी देत डफळापूर, जत येथील लॉज,शेड्याळ,संख,कर्नाटकातील माजलगाव ता.इंडि येथील एका शेतातील वस्तीवर असे दोन वर्षापासून वारवांर पिडितेच्या इच्छेविरूध शरिर संबध ठेवले आहेत.याप्रकरणी पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरून उमदी पोलीसांनी संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.







