जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील जतेत शिक्षण घेणाऱ्या मुलीचे निवास्थान असलेले शहरातील भारती विद्यापीठ मुलीचे वसतिगृहाचे “स्व.श्रीमंत किर्तीमालिनीराजे डफळे मुलींचे वसतिगृह”असे नामकरण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे रवीवार ता.9 जानेवारी 2020 ला सकाळी 9.00 वाजता भारती वसतीगृह येथे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचा कृषी,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याहस्ते शुभारंभ व शालेय शिक्षण समिती,भारती विद्यापीठ पुणेच्या अध्यक्षा श्रीमती विजयमला कदम यांच्या अध्यक्षतेखाली,आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.यावेळी मंत्री डॉ.कदम “युवकांशी संवाद साधणार आहेत.”
जत तालुक्यातील प्रसिद्ध डफळे घराण्याचे समाजिक कार्यातील योगदान व भारती वसतीगृहाच्या उभारणीतील योगदान मोठे आहे.त्यामुळेच या वसतीगृहास “स्व.श्रीमंत किर्तीमालिनीराजे डफळे मुलींचे वसतिगृह असे नामाकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन युवकचे तालुकाध्यक्ष विकास माने यांनी केले आहे.