बोर्गीचे लोकनियुक्त संरपच अविश्वास ठराव हरले

0
4



उमदी,वार्ताहर : बोर्गी बुद्रुक ता.जत येथील लोकनियुक्त सरपंच गुरनिंगव्वा श्रीशैल बिरादार याविरोधात ग्रामसभेने अविश्वास ठराव संमत केला.नव्या नियमानुसार संरपचाविरोधात अविश्वास ठराव दाखल करत विशेष ग्रामसभेत मतदान घेण्यात आले. त्यात संरपचाविरोधात 303 तर संरपचाच्या बाजूने 184 मतदान झाले होते.

त्यात 119 मते विरोधात पडल्याने पद रद्द झाले आहे.ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बोर्गी बुद्रुक गावात विकास आघाडीच्या माध्यमातून थेट सरपंच व सहा सदस्य निवडून आले होते.उपसरपंच राघवेंद्र होनमोरे आणि सदस्य दावल पुळुजकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली होती.मात्र थेट जनतेतून सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत सरपंच म्हणून गुरनिंगवा बिरादार यांची निवड झाली होती.

मात्र,नव्या निवडीनंतर संरपचाचा चांगला कारभार बिघडला होता.एकाधिकार, मनमानी,सदस्यांना विश्वासाच न घेतल्याने त्यांच्याविरोधात तीव्र नाराजी होती. त्यामुळे या सरपंच बिराजदार यांच्या विरोधात ठराव घेत मंजूर करण्यात आला.नुकतेच तहसीलदार सचिन पाटील आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्गी बुद्रुकच्या सरपंचावर अविश्वास ठरावाची प्रक्रिया पूर्ण केली.

यासाठी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलविण्यात आली होती.त्यात

518 ग्रामस्थांचे मतदान घेण्यात आले. त्यात अविश्वासाच्या बाजूने 303 मते पडली तर विरोधात 184 मते मिळाली आणि 31 मते बाद करण्यात आली.विद्यमान संरपच ठराव हरल्याने त्यांचे पद रद्द झाले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here