पंढरपूर : बेलगाम तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे घडली आहे. स्वप्नाली सत्यवान गाजरे असे अल्पवयीन मुलीचे नाव आहे.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या स्वप्नालीच्या आत्महत्येमुळे शेळवे परिसरात खळबळ उडाली असूूून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर अधिक माहिती अशी की, शेळके गावात मयत स्वप्नालीचे वडीलस त्यवान प्रभु गाजरे (वय 43) हे गावात पंचरचे दुकान चालवतात.मुलगी स्वप्नाली ही इयत्ता 11वी मध्ये केबीपी कॉलेज येथे शिकत होती. ती दररोज मोटार सायकलवरून जाता होती. येऊन जाऊन करत होती. सध्या लॉकडाउन लागल्यामुळे घरीच ऑनलाइन शिक्षण घेत होती.
6 डिसेंबर रोजी स्वप्नालीने राहत्या घरी ती अभ्यास करीत असलेल्या खोलीमध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणाने पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.त्यानंतर दोन दिवसांनी नातेवाईकांनी मयत स्वप्नालीची शाळेची बॅग तपासली असता त्यात एक चिठ्ठी आढळून आली होती. या चिठ्ठीत तिने तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्येच करत असल्याचे लिहिले आहे.