जमीन खरेदी-विक्रीत कमिशन ‘एजंट’ वाढले

0
28



जत,प्रतिनिधी : जमीन खरेदी-विक्री व्यवहारात कमी श्रमात ‘इस्टेट एजंट’ मंडळींना लाखो रुपये कमिशन मिळते. या आमिषापोटी अनेक जण या क्षेत्रात ‘एजंट’ म्हणून फिरत आहेत. गल्लोगल्ली त्यांचा सुळसुळाट वाढला आहे. भरपूर कमाई असल्याने ग्राहक मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे.जत शहराचे क्षेत्रफळ झपाट्याने विस्तारत आहे. शेजारच्या ग्रामीण आणि उपनगरात घर आणि जमिनीस पसंती दिली जात असून, त्याला मागणी वाढली आहे.








साहजिकच 

तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे यात लाखो रुपयांचा व्यवहार होत आहे. शहरात एक गुंठा जमिनीचा दर सात लाखांच्या वर आहे. काही भागात हाच भाव दुप्पट ते तिप्पट आहे. त्यामुळे कमिशनपोटी एजंटला अधिक रक्कम मिळते. यातून या क्षेत्रात शेकडो तरुण उतरले आहेत. थोडाफार संपर्क आणि संभाषण कौशल्यावर हा बिगरभांडवली धंदा फोफावला आहे.मोठी साखळीच तयार झाली आहे. एजंटची संख्या वाढल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यामुळे अशा एजंटच्या टोळ्याच शहरभर वावरत आहेत.









व्यवहार फिसकटणे, तिसऱ्यांशी व्यवहार करणे, जागेचा दर्जा, कमिशन कमी देणे किंवा बुडविणे असे प्रकार घडत आहेत. परिणामी ग्राहक, मालक आणि एजंटमध्ये वाद उद्भवतात. या रोषातून त्यांच्यामध्ये हाणामारीचे प्रकार घडत आहेत. प्रसंगी प्राणघातक हल्ले केले जात आहेत.वादातील जागा बळकावणे, जागेवर ताबा मिळविणे, अतिक्रमण हटविणे आदीसाठी याच मंडळींचा पुढाकार असतो. 







पैशांची चटक जीवघेणी एजंटला कमिशनपोटी लाखो रुपये झटक्यात मिळतात.व्यवहार सुरू झाल्यापासून त्यातून मिळणाऱ्या मोबदल्याची आस धरून बसतात. व्यवहारात अनेक एजंट असल्याने प्रत्येकाचा हिस्सा ठरलेला असतो. हातात मोठी रोख रक्कम पडते. त्यामुळे व्यवहारात कमिशनवरून खटके उडतच असतात. व्यवहार होऊनही अपेक्षित कमिशन न मिळाल्याने वादाची ठिणगी पडते. काही जण अधिक लालसेपोटी इतरांना कमी कमिशन देतात किंवा ते देणे टाळतात. त्यातून वादाचे प्रकार होत आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here