मुलानेच केला जन्मदात्याचा खून | बिळूरमधील घटना ; संशयित मुलगा अटकेत

0
4



जत,प्रतिनिधी : मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना जत तालुक्यातील बिळूर येथें गुरुवारी रात्री उशिरा घडली.भीमू सत्याप्पा जामगोंड (वय 83) असे मयताचे नाव आहे.






याप्रकरणी मयताचा मुलगा सदाशिव भीमु जामगोंड (रा.बिळूर,वय 35) याला जत पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी,संशयित आरोपी मुलगा सदाशिव व भीमू यांच्यात जमीनच्या कारणावरून वाद होता.दोन दिवसापुर्वी वडील भिमू यांनी मुलगी महानंदा हिला सोन्याची अंगठी घेतली होती.ही अंगठी कोणाला विचारून घेतली यांचा जाब विचारण्यावरून दोघात वाद झाला.रागाच्या भरात मुलगा सदाशिव यांने वडीलाच्या डोक्यात दगड मारला.






त्यात ते गंभीर जखमी झाले होते.उपचार सुरू असताना त्यांचा मुत्यू झाला आहे.याप्रकरणी महानंदा राजेंद्र कोरे वय 32,रा.बेडग ता.मिरज हिने जत पोलीसात फिर्याद दिली आहे.संशयित सदाशिव याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास स.पो.नि.विनोद कांबळे करत आहेत.




Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here