जत-डफळापूर रस्ता खड्ड्यात | नव्याने केलेलाही रस्ताही उखडला ; भष्ट्र साखळीमुळे कोट्यावधीचा निधी फस्त

0

 



जत,प्रतिनिधी : जत-डफळापूर रस्त्याची खड्ड्यामुळे प्रचंड दुरावस्था झाली असन रस्ता खड्ड्यात गेला आहे.

जतहून सांगलीला जोडणारा हा महत्वाचा महामार्ग आहे.जत ते डफळापूर पर्यतच्या 18 किलोमीटरच्या रस्त्यावर खड्ड्याची मालिका तयार झाली आहे.महत्वाचा असणारा हा मार्ग जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यात्यारित होता.गेल्या काही महिन्यापुर्वी हा मार्ग केंद्रीय रस्ते महामार्ग विभागाकडे गेल्याचे सांगण्यात येत आहे.



डफळापूर कडून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत होते.मात्र दीड महिन्यापुर्वी पावसात सुरू असलेले हे काम थांबविण्यात आले होते.जेथे काम झाले आहे.तोही रस्ता पावसामुळे उखडला आहे.त्यावरही खड्डे पडले आहेत.डफळापूर पासून तेज अँकडमीपर्यत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.तेथून पुढे जतपर्यत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.प्रत्येक पावलानजिक खड्डे पडले आहेत.गेल्या काही दिवसातील पावसामुळे हे खड्डे दोन फुटापर्यत खोदले गेले आहेत.

Rate Card



गेल्या दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यावधीच्या निधीचा चुराडा केला आहे. अधिकारी व ठेकेदाराच्या आर्थिक लाभाच्या प्रवृत्तीमुळे रस्त्यावर दर्जाहिन डांबरीकरण करण्यात आले आहे.गेल्या काही महिन्यापुर्वी रस्ता दुरूस्तीचे काम झाले होते.तो रस्ता आता उखडला असून उखडेलेल्या खड्ड्यात डांबरीकरणाचे अपवाद अवशेष दिसत आहेत.त्यामुळे आता होणारे काम अशी दर्जाहिन काम करणारी भष्ट्र साखळी तोडून चांगले काम करावे अशी मागणी होत आहे.



जत-डफळापूर रस्त्याची झालेली अवस्था

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.