जतेत पाणीपुरवठा पाईपलाईनला गळती

0जत,प्रतिनिधी : जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागल्याने हाजारो लिटर पाणी वाया जात आहे.तातडीने हि गळती काढावी,अशी मागणी होत आहे.मोठा विस्तार असलेल्या जत शहराला बिरनाळ तलावातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला एमआयडीसी जवळ गळती लागली आहे.लोंखडी पाईपलाईनला लिकेज करण्यात आले आहे.त्यांमुळे दररोज हाजारो लिटर पाणी वाया जात आहे.

Rate Cardएकीकडे पावसाळ्यातही शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणी येत असल्याचे आरोप होत आहेत. तर काही ठिकाणी पाणीच पोहचत नसल्याचे वास्तव आहे.तर दुसरीकडे असे पाणी वाया जात असताना नगरपरिषदेचे दुर्लक्ष का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. क्रियाशील नगरपरिषदेचे मुख्यधिकारी यांनी याकडे डोळे उघडून पहावे,अशी मागणी आहे.

जत शहरातील इंदिरा नगर पाईपलाईनला गळती लागली आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.