आयएमएचे जतेत कोव्हिड रूग्णालयाचे सुरू | 50 बेड उपलब्ध : तालुक्यातील रुग्णांना मिळणार दिलासा

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना काटाची उपलब्धता व्हावी,जतेत उपचार मिळावेत यासाठी जत येथील सामाजिक न्याविभाग अनु-जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवाशी शाळा येथे इंडियन मेडिकल असोसिएशन जत यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या कोव्हिडं सेंटरचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. 

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या जत शाखेचे अध्यक्ष डॉ.रोहन मोदी,उपाध्यक्ष डॉ.शरद पवार यांच्या संकल्पनेतून या कोव्हिड सेंटरचे सुरू करण्यात आले. यात 50 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे.तालुक्यातील कोरोना रुग्णावर अत्याधुनिक उपचार येथे उपलब्ध करण्यात आले आहेत.


Rate Cardतसेच यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे,तहसीलदार सचिन पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर, जत नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज देसाई, इंडियन मेडिकल असोसिएशन जत अध्यक्ष डॉ.रोहन मोदी,उपाध्यक्ष डॉ.शरद पवार, डॉ.काळगी, डॉ.गुरव जत मंडळ अधिकारी संदीप मोरे,तलाठी रवींद्र घाडगे,व सर्व पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.
जत येथील जत कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रंसगी आमदार विक्रमसिंह सांवत,प्रांत प्रंशात आवटे,सचिन पाटील

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.