जतेत 48 रुग्ण कोरोना मुक्त

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सर्वाधिक 48 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.तालुक्यातील कोरोनातून बरे होणारी संख्या वाढली असून हे प्रमाण 68 टक्के आहे.मंगळवारी 26 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली.जत शहर 19,आंवढी 2,खैराव 1,डफळापूर 1,रामपूर 1,पाच्छापूर 1,सिध्दनाथ 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या 943 झाली आहे.सध्या 265 रुग्णावर प्रत्यक्षात उपचार सुरू आहेत.644 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

Rate Cardदरम्यान आज जत शहरात होणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन जतच्या वतीने समाज कल्याण वस्तीगृहात   डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची पाहणी आमदार विक्रमसिंह सांवत,प्रांत तहसीलदार यांच्या कडून होणार आहे.जतेत हे सर्वात मोठे कोविड सेंटर सुरू होणार आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.